
अमळनेर (प्रतिनिधी): येथील पत्रकार संघ आणि पोलीस प्रशासन यांच्यात येत्या २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता ऐतिहासिक प्रताप महाविद्यालयाच्या मैदानात मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्याकडे संपूर्ण अमळनेरकरांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूंनी कसून सराव सुरू आहे.
या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना एकत्र आल्या आहेत. ‘महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ’, ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ आणि ‘अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ’ यांच्यातून दिग्गज खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, पोलीस प्रशासनानेही आपले ‘डॅशिंग’ खेळाडू मैदानात उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे. समाजमन आणि कायदा सुव्यवस्था राखणारे हे दोन महत्त्वाचे स्तंभ मैदानात आमनेसामने येणार असल्याने शहरात उत्साहाचे वातावरण आहे.
सदर सदर क्रिकेट सामना हा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघामार्फत आयोजित करण्यात आला आहे, तरी अमळनेर येथील खेळ प्रेमीं प्रेक्षकांनी सदर क्रिकेट सामन्याच्या लाभ घ्यावा.




