
अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची औद्योगिक क्षेत्र भेट सहल एम आय डी सी मध्ये काढण्यात आली.
विद्यार्थ्यांना लघु उद्योग , व्यवसाय प्रशिक्षण मिळावे तसेच विविध उत्पादनाची माहिती प्राप्त व्हावी म्हणून विद्यार्थ्यांची एमआयडीसी मध्ये सहल काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गंगा फूड्स धान्य पॉलीश , आटा फॅक्टरी येथे गव्हापासून सुजी ,रवा , पीठ , मैदा कसे तयार होतात तसेच पाईप फॅक्टरी , पाण्याच्या टाकीची कंपनीत पाईप आणि टाक्या कशा तयार होतात. शुद्ध पाणी तयार होऊन ते बाटल्यांमध्ये कसे भरतात , पुठ्ठाचे खोके कसे तयार करतात , चप्पलचे सोल कसे तयार करतात अशा विविध उद्योगांची माहिती जाणून घेतली. यासाठी दिलीप डेरे , निलेश भांडारकर , जितेंद्र चंद्रात्रे , राधेश्याम शर्मा यांनी मार्गदर्शन केले. तर सहलीसाठी मुख्याध्यापक प्रकाश पाटील , प्रभुदास पाटील , संजय पाटील , राजेंद्र पाटील , सुषमा सोनवणे , शीतल चव्हाण , सीमा मोरे ,सीमा पाटील , प्रवीण पाटील , मनोज पाटील , सुदर्शन पवार , खुशाल पाटील , प्रदीप पाटील यांचे सहकार्य लाभले. उद्योजकांकडून विद्यार्थ्याना मोफत अल्पोपहार देण्यात आला.
या औद्योगिक क्षेत्र भेटीमुळे इयत्ता ५ वि ते १० वि च्या विद्यार्थ्यांना व्यवसाय ,लघु उद्योगाची प्रेरणा मिळाली. मालाची ने -आण ,विक्री ,वाहतूक कशी करतात , बाजारपेठ कशी उपलब्ध होते ,नफा तोटा याबाबत ज्ञान अवगत झाले.




