
अमळनेर : नगरपरिषदेच्या महिला बाल कल्याण विभाग , अमळनेर महिला मंच आणि पोलीस स्टेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला मॅरेथॉन स्पर्धेत जानवी संजय रोझोदे हिने प्रथम तर वॉकेथॉन स्पर्धेत बबिता भिल, कृपाली पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.
युवतींना स्पर्धा परीक्षेसाठी प्रेरणा मिळावी आणि महिला सक्षमीकरणसाठी अमळनेरात सावित्रीबाई महिला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात विविध स्पर्धां घेण्यात येत आहेत.
धार मारवड रस्त्यावर मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष अपर्णा मुठे , तिलोत्तमा पाटील , पद्मजा पाटील , कांचन शहा , वसुंधरा लांडगे ,वैशाली शेवाळे ,प्रा शिला पाटील , माधुरी पाटील , करूणा सोनार , डॉ रवींद्र जैन , प्रमुख अतिथी म्हणून मॅरेथॉन स्पर्धेतील विजयी असे जानवी रोझोदे (प्रथम) , ज्योती महाजन (द्वितीय ), प्रियंका परदेशी (तृतीय), तर उत्तेजनार्थ तेजस्विनी ढाके , उन्नती पाटील , पूजा पाटील , वैशाली पाटील, रोहिणी शिरसाठ , बालिका अमिषा शिंदे
वॉकेथॉन स्पर्धेत लहान गटात बबिता भिल (प्रथम), सपना चोरडिया(द्वितीय), वैशाली पाटील (तृतीय), मोठ्या गटात कृपाली पाटील (प्रथम) , लताबाई भिल (द्वितीय) , रजूबाई पाटील (तृतीय)
गोणपाट स्पर्धेत स्नेहा पहाडे (प्रथम) , बबिता भिल (द्वितीय), माधुरी देशमुख (तृतीय), वैशाली पाटील(उत्तेजनार्थ) यांनी बक्षिसे मिळवले. पंच म्हणून सुनील वाघ , संजय पाटील , मिलिंद पाटील ,सचिन पाटील यांनी काम पाहिले.
मंजुश्री जैन , आरती रेजा कृपाली पाटील ,सविता पाटील , भारती अग्रवाल , योगा ग्रुप , रोहित पाटील यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात महिला महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे, ३ रोजी नाट्यप्रवेश स्पर्धा , ४ रोजी नृत्य स्पर्धा , ५ रोजी बक्षीस वितरण आणि समारोप होणार आहे. तसेच महोत्सवाच्या आधी परसबाग स्पर्धा , गीता वाचन स्पर्धा , फळभाज्यांपासून पाककृती ,दहा मिनिटात म्हणी लिहिणे आदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.




