
अमळनेर : रस्त्यावर चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातून १८ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ दोन अज्ञात मोटरसायकलस्वारांनी चोरून नेल्याची घटना ३० रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास ढेकू रोडवर नवीन रिंगरोड जवळ घडली.
शोभा रामराव सावकारे (रा साईनगर ढेकू रोड) ही महिला नवीन रिंगरोडकडे फिरायला गेली असता सतीश गुलाबराव पाटील यांच्या घराजवळ दोन मोटरसायकलस्वार जवळ आले आणि त्यातील मागे बसलेल्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ ओढून पळून गेले. महिलेने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.




