
अमळनेर:- शिक्षकांच्या परकीय भाषा स्पर्धेत मारवड जि.प. शाळेतील शिक्षक गिरीश पाटील यांनी विभागस्तरावर यश मिळवून राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

नाशिक विभागस्तरीय शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांचेसाठी आयोजित परकीय भाषा (जर्मन भाषा) स्पर्धेत जि.प.केंद्रशाळा मारवड या शाळेतील उपशिक्षक गिरीश पाटील सर यांची राज्यस्तरावर निवड झाली. त्याबद्दल गिरीश पाटील सरांचे जि.प.शाळा मारवड कन्या व बॉईज शाळेतील शिक्षक स्टाफ व विद्यार्थी यांचे मार्फत सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे कन्याशाळेतील विद्यार्थीनींनी सरांचे हस्तलिखीत ग्रीटींग व भेटवस्तूच्या माध्यमातून रोमहर्षक स्वागत केले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने गिरीश पाटील सरांचा सत्कार करण्यात येऊन राज्य स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.




