
अमळनेर : खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालय(स्वायत्त), अमळनेर आणि उच्चतर शिक्षा अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विभागात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले चोपडा येथील साहित्यिक व संशोधक डॉ. मधुचंद्र भुसारे यांचे “खानदेशातील लोकसंस्कृतीचे महत्त्व” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानात त्यांनी खानदेशातील लोकसंस्कृतीचे विविध पैलू विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे उलगडून दाखविले.
डॉ. भुसारे यांनी खानदेशातील लोककला, लोकगीते, लोकपरंपरा, सण-उत्सव, बोलीभाषा आणि ग्रामीण जीवनशैली यांचा सखोल आढावा घेत लोकसंस्कृती ही केवळ भूतकाळाची स्मृती नसून ती समाजाची सांस्कृतिक ओळख जपणारी जिवंत परंपरा असल्याचे प्रतिपादन केले. आधुनिकतेच्या प्रवाहात लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन करणे ही आजच्या पिढीची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमास मराठी विभागप्रमुख डॉ. ज्ञानेश्वर कांबळे, डॉ. विलास गावीत, प्रा. तुषार पाटील, प्रा. सागर सैंदाणे, प्रा. गोपाल बडगुजर, डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी तसेच महाविद्यालयातील विविध विद्याशाखांचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ज्ञानेश्वर कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय व आभार डॉ. ज्ञानसागर सूर्यवंशी यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. गोपाल बडगुजर यांनी केले.




