
अमळनेर:-आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन उद्या मंगळवार दिनांक 6 जानेवारी रोजी पत्रकार भुवन(योगा भुवन) अन्नपूर्णा मंगल कार्यालयाजवळ अमळनेर येथे सकाळी 10 वाजता करण्यात आले आहे.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटना,व्हॉइस ऑफ मीडिया आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आदी अमळनेर शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनांच्या वतीने हा सोहळा होणार असून यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.तरी सदर प्रसंगीं सर्व पत्रकार बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.




