
पुन्हा भरू दे माझी शाळा स्नेहबंध मेळावा उत्साहात संपन्न…
पातोंडा ता.अमळनेर :- येथील श्री दत्त मंदिर माध्यमिक शाळेचे सन २००३ वर्षातील दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा “पुन्हा भरू दे माझी शाळा” स्नेहबंध मेळावा प्रथमच तेवीस वर्षांनी प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य डी.आर. जगताप होते. प्रमुख उपस्थितीत विद्यमान प्राचार्य व्ही.सी. पाटील, निवृत्त शिक्षक एस.के.बागुल, बी.आर. भावसार, आर डी पवार, डी के पाटील, एम बी पाटील, आर व्ही पाटील, शामराव गुरुजी, प्रदीप शिंगाणे, लोटन पवार, सुनीता लोहारे, मोरे सर, लक्ष्मण पवार, विजय झंझणे, किशोर पाटील, राजू संदानशिव, अनिल बिरारी, अमित पवार आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते श्री गुरुदत्त यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला दिवंगत मित्र-मैत्रिणीनां भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांच्या हस्ते गुरुजनांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला. मुलांनी परिवारासह परिचय दिला. तर मुलींनी आपल्या माहेरचा परिचय बरोबर सासर कडील कौटुंबिक परिचय करून दिला. सर्व उपस्थित वर्ग मित्र मैत्रिणी यांनी एकमेकांना भेटून प्राथमिक व माध्यमिक शालेय जीवनातील जुन्या आठवणींना उजाळा देत, अहिराणी सह मराठी भाषेत गप्पा मारल्या. यावेळी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सन २००३ चे रवींद्र पाटील, सागर भदाणे योगिता कदम, गीतांजली कोळी, अनिल पाटील, विजय पवार, नंदू संदानशिव, ज्ञानेश्वर पवार, सुचिता शिंदे, दिपक पाटील, सोपान लोहार, शशिकांत पारधी, विजय महाजन, सरला सुरवाडे, कविता पाटील, पंढरीनाथ पवार, गणेश पवार, राहुल भोई, राजेंद्र झंझणे, सिमा पाटील, संदिप लोहार, महेंद्र चौधरी, चंद्रकांत शिरसाठ, दुर्गेश जैस्वाल, सचिन पाटील, दिपक पवार, सुरेंद्र पाटील, शशिकांत घाडगे, प्रतिभा बिरारी, स्वाती पाटील, प्रतिभा सूर्यवंशी, संदीप संदानशिव, छाया मराठे, कल्पना कुमावद, ललिता पाटील, मनीषा बिरारी, सुमन चित्ते, मिना सोमवंशी, मनीषा चौधरी, मनीषा पाटील, वैशाली बोरसे, समाधान बिरारी, दिपक पारधी, भागवत पाटील, आदी विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान लोहार तर आभार सुरेंद्र पाटील यांनी मानले.




