
अध्यक्षपदी विनोद अग्रवाल विजयी, दोन विद्यमान संचालक थोड्या मतांनी पराभूत…
अमळनेर : खान्देश शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदी विनोद अग्रवाल ११३० मते मिळवून ८१ मतांच्या आघाडीने निवडून आले आहेत. तर कार्यकारी मंडळाच्या आठ जागांसाठी आशीर्वाद पॅनलचे सहा आणि दोन अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत
अध्यक्षपदासाठी सात जण रिंगणात होते. त्यात विनोद अग्रवाल आणि लालचंद सैनानी यांच्यात चुरस होती सैनांनी यांना १०४९ मते मिळाली.यात अक्षय अग्रवाल २७६ , बोरसे विजय जगन्नाथ २७७ ,डॉ रवींद्र कुलकर्णी २४१ , राकेश माहेश्वरी २२७ , विक्रम शहा याना १४२ मते मिळाली. ३१४ मते अवीध ठरली.
विश्वस्त पदासाठी वसुंधरा लांडगे निवडून आल्या असून त्यानी २१४६ मते मिळवली पुरुषोत्तम शेटे यांनी ११४६ मते मिळवली. ३५९ मते बाद ठरली. तर उपाध्यक्ष पदासाठी माधुरी पाटील (१८५६) , कमल कोचर (१८८८) हे दोन्ही विजयी झाले तर सचिन बुधा पाटील (११९४) हे पराभूत झालेत.
संचालक मंडळासाठी
_पंकज गोविंद मुंदडे_(२१६२), प्रदिप कुंदनलाल अग्रवाल (१७१७), हरी भिका वाणी(१६८०) योगेश मधुसूदन मुंदडे (१६७५) लिना प्रविण पाटील(१५९७) निरज दिपचंद अग्रवाल (१५९०) जितेंद्र मोहनलाल जैन(१५४४) डॉ. संदेश बिपीन गुजराथी(१४७१) हे आठ संचालक निवडून आले आहेत. तर डॉ अनिल शिंदे(१४६२) आणि कल्याण पाटील (१४५९) हे दोन विद्यमान संचालक थोड्या मतांनी पराभूत झाले आहेत. त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत फेरमतमोजणी सुरू होती. म वा मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांना खा शि मंडळात मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. माजी संचालक दिलीप जैन , व प्रवीण जैन, विद्यमान अध्यक्ष जितेंद्र झाबक यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पंडित चौधरी , चिटणीस प्रा पराग पाटील , मनोहर महाजन ,प्रा सुनील गरुड , विवेक भांडारकर यांनी काम पाहिले.




