
अमळनेर – येथील प्रताप वरिष्ठ महाविद्यालयातील सृष्टी शिंदे, भाग्यश्री पाटील, धनश्री पाटील, नंदिनी जाधव, प्राची शिरसाठ यांची बनस्थली विद्यापीठ निवाई (राजस्थान) येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली संघ १२ ते १९ जानेवारी दरम्यान स्पर्धा सामने खेळेल.
आंतर महाविद्यालय आणि विभागीय स्पर्धेत निवड होऊन सर्व महिला क्रिकेटपटू यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेत स्थान मिळविले या यशाबद्दल खा. शि मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्थ, कार्याध्यक्ष डॉ. संदेश गुजराथी, कार्योपाध्यक्ष सी ए श्री निरज अग्रवाल,मा. सर्व संचालक मंडळ, सचिव प्रा. पराग पाटील ,प्र.प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, सर्व उप प्राचार्य, मा. IQAC व RUSA समन्वयक डॉ. मुकेश भोळे, जिमखाना समन्वयक व अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर,निवड समिती प्रमुख डॉ. देवदत्त पाटील, एरंडोल विभाग सचिव डॉ. शैलेश पाटील,कुलसचिव राकेश निळे, सर्व जिमखाना समिती सदस्य,क्रिकेट संघ व्यवस्थापक डॉ. सचिन पाटील,क्रीडा शिक्षिका प्रा. अर्चना सचिन पाटील , प्रा. ए. के अग्रवाल,मिलिंद शिंदे,संजय पवार सर , प्रशांत देवकते आणि सर्व प्रताप महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, खेळाडू यांनी क्रिकेट खेळाडूंचे अभिनंदन व कौतुक केले.




