
आज उच्च न्यायालयात होणार सुनावणी,निवडणुकीवर प्रश्नचिन्ह
अमळनेर :- येथील खानदेश शिक्षण मंडळाच्या निवडणुकीतील मतदार यादी आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेविरोधात अमळनेर येथील निवडणुकीत पराभूत झालेले उमेदवार कल्याण पाटील व डॉ. अनिल शिंदे यांनी बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे.
सदर याचिकेवर आज दिनांक 9 जानेवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.यात निवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसर, मंडळाचे अध्यक्ष तसेच १८ उमेदवारांना औपचारिक प्रतिवादी करण्यात आले असून न्यायालयाने प्राथमिक सुनावणी घेऊन नोटिसा बजावल्या आहेत.यात दोन्ही उमेदवारानी पैसे भरून फेरमोजणीची मागणी केली असता निवडणूक समितीने संपूर्ण मतपत्रिका पुन्हा न मोजल्याने सदर याचिका दाखल करण्यात आली आहे. या रिटमुळे खान्देश शिक्षण मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




