
अमळनेर:- तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषन अभियान – 2025-26 अंतर्गत २ रा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. यावेळी मुगनंतर ज्वारी प्रकल्प अंतर्गत गावातील. धरतीमाता महीला शेतकरी गटाचे व गृप ग्राम पंचायत सदस्य तसेच इतर लाभार्थी शेतकरी यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय भेट देवून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी पूनम पाटील यांनी प्रशिक्षणाचे उद्दिष्ट व महत्त्व समजावुन प्रस्तावना केली
सहाय्यक कृषि अधिकारी, महेंद्र पवार यांनी ज्वारी पिकाची लागवड पासून त्यांनी ज्वारी पिकावरील समस्या, कीड व रोग, खत व्यवस्थापन, एकात्मिक कीड नियंत्रण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. ज्वारी पिकावरील करपा व कानी नियंत्रण करण्यासाठी मशागतीय उपायोजना, यांत्रिक नियंत्रण, जैविक नियंत्रण व रासायनिक नियंत्रण पद्धतीची माहिती दिली. या वेळी ज्वारी लागवड ते काढणी पश्चात तंत्रज्ञानाची सखोल माहीती दिली. शेतकऱ्यांच्या कापूस, मका इतर पिकाच्याविषयी. मार्गदर्शन सुद्धा महेंद्र पवार यांनी केले. उपकृषि अधिकारी ,मंडळ कृषि अधिकारी, प्रफुल्ल पाटील तसेच तालुका कृषि अधिकारी चंद्रकांत ठाकरे आंचे कार्यक्रमास मार्गदर्शन लाभले. तसेच शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.
यावेळी चिमनपुरी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच वर्षा पाटील, महिला बचत गट चे सी आर पी स्वाती पाटील,धरती माता महिला शेतकरी गटाचे सर्व सदस्य,सामाजिक कार्यकर्ते युवराज डी पाटील, रवींद्र पाटील,भैय्या पाटील, गोकुळ पाटील, संतोष चौधरी, पुरुषोत्तम चौधरी आदी उपस्थित होते.




