
बाजार समितीने पेट्रोल पंपाच्या आवारात उभारले तालुक्यातील पहिले चार्जिंग स्टेशन…
अमळनेर : तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने पातोंडा येथे इलेक्ट्रिक वाहनाच्या चार्जिंग ची व्यवस्था सुरू केली आहे. तालुक्यातील हे पहिले चार्जिंग केंद्र असल्याने शेतकऱ्यांची व वाहनधारकांची सोय झाली आहे.
अमळनेर चोपडा रस्त्यावर पातोंडा हे मध्यवर्ती ठिकाण असून कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी पेट्रोल पंप सुरू केला आहे. परिसरात पेट्रोल पंप नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व इतर शेती उपयुक्त वाहनांसाठी पेट्रोल डिझेल मिळत नव्हते. मात्र बाजार समितीने पंप उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांचा इंधन आणायला लागणारा पैसा वाचला आहे. आता बहुतेक वाहने इलेक्ट्रिक झाल्याने अशा वाहनच्या चार्जिंग ची सोय उपलब्ध केली आहे. या चार्जिंग स्टेशनवर एकाच वेळी दोन चार चाकी आणि एक दुचाकी अशी तीन वाहने चार्जिंग होतील. फक्त अर्ध्यातासात वाहनांची बॅटरी पूर्ण चार्ज होतील. बाहेरुन येणाऱ्या वाहनधारकांसाठी आणि परिसरातील स्थानिक नागरिकांची सोय होणार आहे.




