
अमळनेर : मागील वादावरून कुरापत काढून सात जणांनी एकाला लोखंडी रॉडने व लाथा बुक्क्यानी मारहाण करून त्याच्या जवळून मोबाईल ,सोन्याची साखळी आणि रोख असा एकूण ७६ हजार ५०० रुपयांचा ऐवज काढल्याची घटना ९ रोजी रात्री ११:५५ वाजता साळी वाड्यात घडली.
शुभम दिलीप वाणी यांनी फिर्याद दिली की, कैसर आबीद सैय्यद (रा दर्गाअली मोहल्ला गांधलीपुरा) हा ११ नोव्हेंबर रोजी घरासमोरून मोटरसायकलवर जाताना जोरात हॉर्न वाजत असताना त्याच्याशी वाद झाले होते. तसेच ९ रोजी साडे आठ वाजता शुभम त्याच्या मित्रांसोबत जेवायला गेला असता तेथेही कैसर दारू पिलेल्या अवस्थेत आला आणि त्याने अच्छे गाणे बजा रहा है म्हणत शुभम च मोबाईल हिसकावून १०-१५ मिनिटे घेऊन गेला. त्यानंतर सर्व घरी निघून गेल्यावर कैसर याने रात्री ११:५५ वाजता शुभम ला फोन करून त्याच्या घराबाहेर बोलावले. त्यावेळी शुभमचा मित्र मुकेश देखील पोहचला. तेव्हा कैसर सोबत जाकीर पठाण ,नावेद शेख समीर उर्फ कुबड्या , समीर शेख मोइनोद्दीन रा गांधलीपुरा तसेच इम्रान शेख रा शाह आलमनगर , नासिर शेख उर्फ चिकू रा गांधलीपुरा ,साहिल शेख इस्लामपुरा हे हजर होते. कैसर व जाकीर यांच्या हातात लोखंडी रॉड होता. तर नावेद शेख याच्या हातात चाकू होता. शुभम ने त्याला तू घर तक आ गया असे विचारताच कैसर याने अश्लील शिवीगाळ केली. मुकेश त्याला बोलायला गेला असता त्याने मुकेशच्या पोटात बुक्का मारला आणि तू मध्ये पडू नको चुपचाप चालला जा नाहीतर तुझंही गेम वाजवेल असे सांगितले. आणि कैसरने शुभम च्या डोक्यात लोखंडी रॉड मारला पुन्हा दुसरा वार करत असताना शुभमने तो हातावर अडवला. शुभम खाली पडला तेव्हा कैसर आणि जाकीर यांनी हातातील रॉड ने पाठीवर ,पायावर मारहाण केली. इतरांनी देखील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्या पैकी कोणीतरी गळ्यातील सोन्याची ६० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी ओरबाडली तसेच १० हजार रुपयांचा मोबाईल आणि खिश्यातील ६ हजार ५०० रुपये काढून घेतले. आरडाओरडा ऐकताच गल्लीतील लोक गोळा झाल्यावर ते पळून गेले. त्यानंतर लोकांनी शुभम ला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. शुभमने दवाखान्यातून पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार सातही जणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९ , ११९(१),११८(१),११५(२), ३५२,१८९(२), १८९(४), १९१(२), १९१(३),१९० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज करीत आहेत.




