
अमळनेर : सोनगीर अमळनेर बस रस्त्याच्या बाजूला कलंडल्याची घटना १४ रोजी दुपारी वावडे गावाच्या सब स्टेशनजवळ घडली. सुदैवाने कोणत्याच प्रवाशाला दुखापत झाली नाही.
एम एच १४ बी टी १४४७ ही बस अमळनेरहून सोनगीर कडे जाणारी बस तरवाडे गावापासून पुढे गेल्यानंतर ट्रॅक्टरला ओवरटेक करताना अचानक ब्रेक लावल्याने चाक घासत जाऊन बस रस्त्याच्या कडेला कलंडली. या बस मध्ये २० ते २२ प्रवासी होते. मात्र सुदैवाने कोणालाच काही लागले नाही बसचा दरवाजा वरच्या बाजूला असल्याने प्रवाश्यांना निघणे अशक्य होते. वावडे गावाकडून येणाऱ्या ट्रॅक्टरमधील लोकांनी लाकडी फळ्यांच्या सहाय्याने सर्व प्रवाश्यना सुखरुप बाहेर काढले. कोणालाही दुखापत न झाल्याने प्रवाश्यावरची संक्रांत टळली. मात्र यात बसचे उजव्या बाजूचे काच फुटून इतर नुकसान झाले आहे. याप्रकरणी बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेकॉ संजय पाटील हे करीत आहेत.




