
अमळनेर:- येथील नगर परिषद स्वच्छता विभाग मार्फत १४ रोजी शहरात कारवाई करून मांजा व प्लास्टिक जप्त करण्यात आले.
महाराष्ट्र शासन प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या आदेशांनुसार कारवाई करण्यात आली. यात शहरात विविध भागात जावून प्रत्यक्ष पाहणी करून नायलॉन मांजा विक्री , प्लास्टिक विक्री करणारे दुकानदार, नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडविणारे नागरिक यांचे कडून जप्ती करण्यात आली. यात नगर परिषद स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक संतोष माणिक, स्वच्छता निरीक्षक संतोष जाधव, स्वच्छता निरीक्षक किरण खंडारे, मुकादम स्वप्नील बिऱ्हाडे, मुकादम गौतम मोरे, शहर समन्वयक गणेश गढरी, श्याम करंदीकर, अनंत संदानशिव, योगेश पवार, महेंद्र बिऱ्हाडे, भरत आगळे, प्रवीण बिऱ्हाडे, कुंदन सोनावणे, सतीश बिऱ्हाडे, युनूस शेख आदी उपस्थित होते. सदर कारवाई दरम्यान एकूण २०२ किलो जप्त करण्यात आले असून शहरातील तीन प्लास्टिक विक्रेत्यांना १५ हजार रुपये दंड ठोठावत कारवाई करण्यात आली.




