
अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथे भाऊ बंदकीत वाद होऊन दोन्ही गटातर्फे एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अरुण दौलत संदानशीव यांनी फिर्याद दिली की १३ रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास प्रशांत राघो संदानशीव, जयवंत राघो संदानशिव , संगीता उर्फ सृष्टी प्रशांत संदानशिव , अविनाश राघो संदानशीव , योजना अविनाश संदानशिव , अनिता उर्फ दिशा संदानशिव , भाईदास हिरामण बैसाणे, मनोज भाईदास बैसाणे , संदेश भाईदास बैसाणे हे घरी आले आणि याने आपल्या दारूचा धंदा बंद केला याला सोडू नका म्हणत शिवीगाळ केली. ते हातात लाठ्या काठ्या घेऊन आले त्यांनी घराबाहेर लावलेले कॅमेरे फोडले. त्याचवेळी ११२ डायल केलेले असल्याने पोलीस आले आणि सर्व जण पळून गेले. वरील सर्व जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर विरुद्ध गटातर्फे महिलेने फिर्याद दिली की चुलत जेठ अरुण दौलत संदानशिव याने १३ रोजी दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास महिलेला अश्लील शिवीगाळ करत माझ्या केस मध्ये साक्षीदार का झाली असे म्हणत हात धरून विनयभंग केला. महिलेच्या फिर्यादीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.



