
अमळनेर : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या मंगलमूर्ती चौकातील पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम मशीन लांबवण्याचा प्रयत्न केल्याची घटना १५ रोजी रात्री ते १६ रोजी सकाळ दरम्यान घडली.
मंगलमूर्ती बँकेजवळ चौकात पंजाब नॅशनल बँकेचे एटीएम फुटल्याची माहिती पोलिसांनी शाखा प्रमुख राकेश भीमराव जगताप याना कळवण्यात आली. राकेश जगताप यांनी सांगितले की ए टी एम मशीन मध्ये २३ लाख २० हजार रुपये बॅलन्स होता. शाखा प्रमुखांनी १५ रोजी दुपारी एक लाख रुपये टाकले. मध्यरात्री च्या सुमारास एक चोरटा पिकअप व्हॅन घेऊन आले. त्यांनी सुरुवातीला अलार्म बंद केला नंतर ए टी एम मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले. त्यांनतर साखळीने एटीएम मशीन ओढून खाली पाडले. कदाचित आवाज मोठा झाला असावा म्हणून चोरट्यानी तेथून पळ काढला. सुदैवाने पैसे सुरक्षित होते. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान घटनेचे वृत्त कळताच डीवायएसपी विनायक कोते ,पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, श्वान पथक , ठसे तज्ञ , फॉरेन्सिक पथकाने भेट देऊन पंचनामे केले. चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याने लवकरच चोराला पकडण्यात यश येईल असा आत्मविश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.




