
अमळनेर : जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत अमळनेरच्या सात युवकांनी व एका युवतीने विजय मिळवत त्यांची वेगवेगळ्या गटासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. एकाच वेळी आठ खेळाडू निवड झाल्याने अमळनेरसाठी हा बहुमानाचा क्षण आहे.
भडगाव तालुक्यातील पेडगाव येथे ही निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. खुल्या गटातून फ्री स्टाईल साठी निजाम अली सैय्यद याची ९२ किलोच्या गटात , तर ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत वरिष्ठ गटातून भावेश दिलीप कोळी याची ६० किलो वजन गटात , संदीप पाटील यांची ७२ किलो गटात , तर २० वर्षाच्या आतील गटात मुकेश बाविस्कर याची ६५ किलो वजन गटात , प्रतीक दीपक पाटील यांची ६० किलो वजन गटात निवड झाली आहे. तर फ्री स्टाईल गटात योगीराज चौधरी हा ६५ किलो वजनाच्या गटात विजयी झाला आहे. तो चहा विक्रेत्यांचा मुलगा आहे. १७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये जयश्री अरविंद वीरकर हि ५७ किलो वजन गटात विजयी झाली असून या सर्वांची राज्यस्तरावर होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत पवन प्रताप शिंपी हा ७९ किलो वजन गटात उपविजेता ठरला आहे.
आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अमळनेर तालुक्यातील क्रीडा संकुलात कुस्तीसाठी स्वतंत्र हॉल आणि मॅट उपलब्ध झाल्याने तरुणांचा दररोज सराव सुरू होता. त्यामुळेच पहिल्यांदा आठ जणांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. क्रिडा संकुलसाठी जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक ,तालुका क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी , क्रीडा संघटक सुनील वाघ , कार्याध्यक्ष संजय पाटील यांनी प्रयत्न केले होते. कुस्तीपटूना पैलवान बाळू पाटील , संजय कौतिक पाटील , महाराष्ट्र चॅम्पियान रावसाहेब पैलवान , संजय भिला पाटील , प्रताप शिंपी ,शब्बीर पैलवान ,भरत पवार, प्रवीण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.




