
अमळनेर : तालुक्यातील दहिवद , रुंधाटी व शहरातील कृषी विकास कॉलनीतून तीन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत.
दहिवद येथील शिक्षण घेणारी १९ वर्षीय तरुणीचे आई वडील १६ रोजी शेतात कामाला गेले होते ते दुपारी अडीच वाजेला परत आले तेव्हा त्यांची मुलगी त्यांना घरात दिसून आली नाही. नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती मिळून आली नाही म्हणून पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल विजय भोई करीत आहेत.
त्याचप्रमाणे पिंपळे रस्त्यावरील एक १९ वर्षीय तरुणी १७ रोजी सकाळी साडे सात वाजता धनदाई कॉलेज जवळून बेपत्ता झाली आहे. वडिलांच्या खबरीबरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.
तर तालुक्यातील मठगव्हाण येथून भडगाव तालुक्यातील आमडदे येथील ३४ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. तिच्या भावाच्या खबरीवरून हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.




