
अमळनेर:- शहरातील अंदरपुरा मोहल्ला येथे आधार संस्था अंतर्गत सुरु असलेल्या विप्रो केअर्स सहाय्यीत शहरी आधार आरोग्य प्रकल्पाच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी शिबिर नुकतेच यशस्वीपणे संपन्न झाले.
या शिबिरामध्ये डॉ. चेतन पाटील यांनी नागरिकांची सखोल नेत्र तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी या शिबिराचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. डोळ्यांची कमजोरी, मोतीबिंदू, चष्म्याची गरज आदी बाबींवर तपासणी व सल्ला देण्यात आला. या प्रसंगी आधार संस्था अध्यक्ष डॉ. भारती पाटील, संचालक रेणू प्रसाद मॅडम, दिप्ती गायकवाड, योगिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी शहरी भागातील गरजू नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे सांगितले. स्थानिक नागरिकांनी अशा उपक्रमांचे स्वागत करत आधार संस्था व विप्रो केअर्सचे आभार मानले. भविष्यातही अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.




