
अमळनेर : येथील दिनेश शशी बागडे याला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे गुणवंत खेळाडू हा पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आला.
नुकतेच दिनेश बागडे याने उत्तराखंड येथे झालेल्या पॅरा पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत १०७ किलो वजन गटात रौप्य पदक मिळवले होते. २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त त्याला जळगाव येथे ‘गुणवंत खेळाडू’ पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल , पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व इतर अधिकारी पदाधिकारी हजर होते.




