
अमळनेर : प्रजासत्ताक दिनी ठिकठिकाणी देशभक्ती व संविधानाचा जागर करण्यात आला. मुख्य शासकीय ध्वजारोहण उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार अनिल पाटील , तहसीलदार रुपेश कुमार सुराणा , लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर , उपनगराध्यक्ष प्रशांत निकम ,गटविकास अधिकारी एन आर पाटील , माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील , बाजार समिती सभापती अशोक पाटील , बांधकाम सभापती साहेबराव पवार , जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील , पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम , अर्बन बँक चेअरमन भरत ललवाणी हजर होते. विक्रांत पाटील , स्वप्ना पाटील ,डॉ संदीप जोशी , उद्योगपती प्रवीण पाटील, लीना पाटील , जितेंद्र जैन हजर होते.
ध्वजारोहण होताच अवकाशात शेकडो तिरंगी फुगे सोडून राष्ट्रध्वजला सलामी देण्यात आली. तसेच स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंब आणि आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांचा शासकीय सन्मान करण्यात आला. यावेळी विविध शाळांनी देशभक्तीपर व सामाजिक विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उत्कृष्ट पोलीस पाटील, उत्कृष्ट बीएलओ , राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. उद्योगपती स्व. आर के पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोनाली पाटील यांच्या सहकार्याने बक्षिसे देण्यात आली. लायन्स क्लब , रोटरी क्लब , पोलीस पाटील संघटना , मिलिंद नवसारीकर ,येझदी भरुचा , डॉ रवींद्र कुलकर्णी ,डॉ रवींद्र जैन , महेंद्र पाटील, नितीन विंचूरकर ,अजय हिंदुजा , किशोर अहिरराव यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील, वसुंधरा लांडगे यांनी केले.
शासकीय सांस्कृतिक कार्यक्रमात ममता विद्यालय , इंदिरा गांधी विद्यालय , सानेगुरुजी विद्यामंदिर , न्यू व्हिजन स्कूल ,सानेगुरुजी कन्या विद्यालय , के डी गायकवाड हायस्कूल , सरस्वती प्राथमिक विद्यालय , जी एस हायस्कूल , डी आर कन्या शाळा , सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय ,लोकमान्य विद्यालय , पिबीए इंग्लिश मिडीयम स्कूल , रॉयल उर्दू हायस्कूल, आर्मी स्कूल आदी शाळांनी सहभाग घेतला होता.
यावेळी बालविवाह मुक्तीची शपथ घेण्यात आली. पोलिसांचे संचलन करण्यात आले. यावेळी नाना धनगर ,पंकज साळी , नायब तहसीलदार सी यु पाटील , प्रशांत धमके , राजेंद्र ढोले , जोशी , पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड , पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज , नरेंद्र संदानशिव हजर होते.
तहसील कार्यालयात देखील प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते ध्वजरोहन करण्यात आले.
मंगरूळ येथे स्व आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक विद्यालयात माजी पोलीस पाटील बापू पाटील , ग्रामपंचायतीत गुणवंत विद्यार्थी राहुल दीपक पाटील , विका सोसायटीत सिंधुबाई गुलाब पाटील ,व श्रीकृष्ण चौकात हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सरपंच समाधान पारधी ,संस्थेच्या उपाध्यक्ष पियुषा पाटील , मुख्याध्यापक प्रकाश पाटील , अशोक सूर्यवंशी , प्रभुदास पाटील ,संजय पाटील ,राजेंद्र पाटील , सुषमा सोनवणे , सीमा मोरे , शीतल चव्हाण , सीमा पाटील ,प्रवीण पाटील , राहुल पाटील , सुदर्शन पवार ,योगेश पाटील , खुशाल पाटील, प्रदीप पाटील , भटू पाटील हजर होते. सानेगुरुजी विद्यालयात माजी विद्यार्थिनी नगरसेविका अपूर्वा जालंदर चौधरी हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डी आर कन्या शाळेत क्रीडा संघटनेचे तालुकाध्यक्ष तथा पर्यवेक्षक सुनील वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मांडळ येथे प्रजासत्ताक दिवस साजरा.

आज दिनांक 26 जानेवारी रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने, मांडळ ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्वजारोहण, सरपंच कविता दीपक बडगुजर, यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ग्राम विस्तार अधिकारी प्रांजल वाघ, उपसरपंच मंगा कांबळे, माजी सरपंच किरण जैन, माजी सरपंच डॉक्टर अशोक हिम्मतराव पाटील, माजी सरपंच सौ विद्याबाई विजय पाटील, माजी सरपंच सौ मीनल बाई सुरेश कोळी, माजी सरपंच कुसुमबाई भास्कर पाटील, मा. पंचायत समिती सभापती डॉक्टर दीपक पाटील, माजी सरपंच नथु भाऊराव पाटील, भास्कर पाटील, पोलीस पाटील सौ शुभांगी सुरेश पाटील, तलाठी संदीप माळी, कोतवाल मिथुन बडगुजर,आदर्श हायस्कूल चेअरमन तनेश शिरसाट, सुरेश लोटन कोळी, विजय सिताराम कोळी, विजय नथू पाटील संतोष पुंडलिक पाटील राजूभाऊ धनगर, रावसाहेब पंडित कोळी, आरडी कोळी, काशिनाथ बडगुजर, बाळासाहेब पवार, राजू गुरुजी, देवा कोळी , हिरामण पुना कोळी, सुदर्शन पवार, विकास बडगुजर, सोसायटी चेअरमन नामदेव बडगुजर, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व विकास सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक कोळी, डोंगरगावकर अण्णा पाटील, वसंत वाघ, गावातील ग्रामस्थ, हजर होते.
मराठी मुलांची शाळा येथे ध्वजारोहण बन्सीलाल शिरसाठ यांनी केले, तलाठी कार्यालय येथे ध्वजारोहण पोलीस पाटील शुभांगी सुरेश पाटील यांनी ध्वजारोहण केले, मराठी मुलींची शाळा येथे ध्वजारोहण सुनिता दीपक कोळी यांनी केले, आदर्श हायस्कूल मांडळ येथे ध्वजारोहण मुख्याध्यापक बी बी चव्हाण सर यांनी केले.




