
अमळनेर:- प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील चिमणपुरी पिंपळे अनोखा उपक्रम राबवत जवानाच्या पत्नी व मातांचा सन्मान ग्रामपंचायतीकडून करण्यात आला,
गावातील शुरवीर मातांनी आपल्या पुत्रांना सीमेवर रक्षणासाठी पाठविले त्याच्या सन्मान करण्यासाठी संकल्पना
लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज पाटील यांनी मांडली त्या सर्व सदस्यांनी समंती दिली. यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम शेती संघ प्रेसिडेंट संजय पुनाजी पाटील, सेवानिवृत्त मंडळाधिकारी डी आर पाटील, सेवानिवृत्त जगदीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. गावातील देश सेवा करणारे जवान, महाराष्ट्र पोलीस, सैन्य दल, रेल्वे पोलीस, इतरत्र ठिकाणी सेवा देणाऱ्या व गावाचे नाव लौकीक करणाऱ्या मुलांचा गुण गौरव म्हणुन त्यांच्या मातोश्रीचे सन्मान व
सेवानिवृत्त सैनिक यांच्या पत्नींचा ही सत्कार यावेळी करण्यात आला. पंकज उमराव पाटील (सशस्त्र सीमा बल जम्मू काश्मीर) याचा ही या कार्यक्रमानिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मिनाबाई पाटील ,सदस्या शोभाबाई पाटील ,सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्या कल्पना पाटील, सदस्या राजश्री पाटील,सदस्य संतोष चौधरी, सदस्य अरुण पाटील,सदस्य लोटन पाटील, माजी उपसरपंच पुरुषोत्तम चौधरी माजी सरपंच भाऊसाहेब पाटील विकास सोसायटी चेअरमन युवराज पाटील, विकास सोसायटी सदस्य गुलाब पाटील, जयवंतराव पाटील, गोकुळ पाटील, विनोद पाटील, धनराज पाटील, निंबा चौधरी, सुरेश चौधरी, राजेंद्र पाटील, रोहिदास पाटील, संभाजी पाटील, भटू पाटील, हरिलाल पाटील, मनोहर चौधरी, संजय भटा पाटील, सुभाष पुंजू चौधरी संतोष मन्साराम पाटील विश्वास हिलाल पाटील सुनील मुरलीधर पाटील दाजीबा सुखदेव पाटील धनराज हिंमत पाटील सुरेश बनगर पाटील पितांबर भास्कर पाटील हरिलाल महादू पाटील विकास सोसायटी सदस्य महेंद्र गटा पाटील राजेंद्र ताराचंद पाटील छोटू दमन चौधरी अरविंद लुका पाटील उमाकांत रमेश चौधरी श्याम लुका पाटील मनोहर दगा पाटील प्रशांत रामकृष्ण पाटील भाऊसाहेब रमेश पाटील महेश भीमराव पाटील आदी उपस्थित होते. गावातील नुकतेच झालेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात निवड झालेल्या धीरज धनराज पाटील यांचा ही यावेळी सर्व ग्रामस्थांच्या वतीने व धरती माता शेतकरी महिला बचत गट कडून सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद व सुकलाल आनंदा माध्यमिक विद्यालय चे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मुख्याध्यापक व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने महिला व ग्रामस्थांनी उपस्थिती लाभली.




