
अमळनेर (प्रतिनिधी):- तालुक्यातील खडके येथील तृप्ती मनोज (जयदीप) पाटील यांना २६ जानेवारी रोजी उत्कृष्ट पोलिस पाटील पुरस्काराने गौरविण्यात आले.महसूल व पोलिस प्रशासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.तृप्ती पाटील यांनी गावातील सामाजिक सलोखा राखण्यासाठी वेळेवेळी प्रयत्न केले आहेत.
तालुक्याचे आमदार अनिल भाईदास पाटील, प्रांताधिकारी मयूर भंगाळे,उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम,माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, नगराध्यक्ष डॉ.परीक्षित बाविस्कर यांच्या उपस्थितीत तृप्ती पाटील यांना गौरविण्यात आले.




