
अमळनेर : मागील भांडणाच्या कारणावरून दोघांनी एकाला लाकडी दांडक्याने मारून जखमी केल्याची घटना २७ रोजी रात्री १वाजता गांधलीपुरा भागातील मेहतर कॉलनीजवळील कब्रस्थान जवळ घडली.
शाहरुखखान रहिमखान पठाण रा चुनाघाणी गांधलीपुरा हे २७ रोजी रात्री १ वाजता कब्रस्थान जवळ उभे असताना विकी घोगले व दीपक प्रभूदास लोहरे हे दोघे आले. विकी ने शिवीगाळ सुरू केली. त्याला शाहरुखखान याने विरोध केला असता दोघांनी त्याला जमिनीवरून खाली पाडले आणि लथाबुक्क्यांनी मारहाण केली. दीपक ने लाकडी दांडक्याने डाव्या हाताला मारहाण केली. दोघांविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता ११८(१),११५(२),३५१(२) ,३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.




