
अमळनेर:- तालुक्यातील मारवड रस्त्यावर मधमाशांनी मोटरसायकलवरील तिघांवर हल्ला केल्याने यात 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून दोन जन गंभीर जखमी झाले आहेत
27 रोजी बोहरा येथील ४० वर्षीय समाधान झुलाल भिल हे ६५ वर्षीय आई नकुबाई झुलाल भिल व 3 वर्षाचा भाचा आर्यन उमेश भिल यांना सोबत घेऊन अमळनेर जात असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मारवड येथील पेट्रोल पंपाच्या जवळ आगेमोहोळाच्या मधमाशांनी जबरदस्त हल्ला केला, त्यामुळे ते गडबडले. त्यावेळी वृद्ध महिला मधमाशांच्या तावडीत सापडली. मुलाने वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनाही मधमाशांनी घेरले. महिलेने आरडाओरडा करीत लहान नातवास दूर नेण्यास समाधानला सांगितले. मात्र मधमाशांच्या जबर हल्ल्यात नकुबाई भिल या सर्वाधिक जखमी झाल्या. तर त्यांचा मुलगा समाधान व नातू आर्यन हे दोन्हीही जबर जखमी झाले. वृद्ध महिला व लहान मुलगा हे दोन्ही तर जागेवरच बेशुध्द पडले होते. तिघांना त्वरित अंमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्रथमोपचार करून त्यांना धुळे येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना नकुबाई यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. नकुबाई भिल यांचा मुलगा समाधान हा पायाने अपंग असून उदरनिर्वाहासाठी ते बोहरा येथे किराणा दुकानाची छोटी टपरी चालवून चरितार्थ चालवीत होते. अतिशय गरीब व आदिवासी कुटुंबावर कोसळलेल्या या प्रसंगाने परिसरात हळहळ व्यक्त होत




