
अमळनेर:- शहरातील मुंदडा नगर २ भागात सोमेश्वर महादेव मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आयोजित करण्यात आला असून ४ ते ६ फेब्रुवारी दरम्यान हा सोहळा पार पडेल.
प.पू. हभप १००८ श्री संत ईश्वरदास महाराज व गोविंद महाराज यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार असून मुख्य आचार्य म्हणून वै.शा.सं.श्री. अभयशास्त्री जोशी व प्रमुख अतिथी म्हणून मुंदडा बिल्डर्सचे संचालक ओमप्रकाश मुंदडा उपस्थित राहणार आहेत. ४ तारखेला श्री स्वामी समर्थ मंदिर पासुन ते मुंदडा नगर २ पर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे.तसेच विविध पूजा विधींना सुरुवात होणार आहे ६ रोजी महाप्रसादाचे ही आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मुंदडा सिग्नेचर मित्र परिवाराकडून(मुंदडा नगर 2 गलवाडे रोड) करण्यात आले आहे.




