
अमळनेर(प्रतिनिधी):- येथील मच्छिंद्र मनिलाल लांडगे यांची भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष गोपाळ रामकृष्ण भंगाळे यांनी जिल्हा कार्यकारणी जाहीर केली असून त्यात मच्छिंद्र लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मच्छिंद्र लांडगे यांच्या निवडीबद्दल खासदार स्मिता वाघ तसेच भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.




