
शिरूड येथे महाजन बंधूंनी पाडला आदर्श पायंडा…
अमळनेर:- तालुक्यातील शिरुड येथील विकास सोसायटीचे चेअरमन बापूराव भिवसन महाजन व रावसाहेब भिवसन महाजन यांच्या मातोश्री यांचे निधन झाले होते. त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने शिरूड गावातील छत्रपती शिवाजी महाराज ध्येयपूर्ती अभ्यासिकेला आईच्या स्मरणार्थ स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली.
गावातील गोरगरीब मुलांना स्पर्धा परीक्षेचे पुस्तके देऊन एक आदर्श पायंडा महाजन कुटुंब यांनी घालून दिला. ग्रामीण भागामध्ये वाय-फाय युक्त अभ्यासिका सुरू करण्यात आली होती. त्यावेळेस देखील महाजन कुटुंबीयांनी सढळ हाताने मदत केली होती. त्यानंतर आईच्या दशक्रियाच्या विधीच्या दिवशी देखील त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके देऊन मदत केली आहे. तसेच उपस्थित सर्व महिलांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुस्तके देऊन शिक्षणाचा व चांगल्या विचारांचा वारसा जपण्याचे कार्य केले. त्यांनी सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमात गावकऱ्यांनी अभिनंदन करण्यात येत आहे. सदर स्पर्धा परीक्षेची पुस्तके त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांना समन्वयक यांच्या उपस्थितीत सुपूर्त करण्यात आले. यावेळी गावातील विविध मान्यवर हजर होते.




