
अमळनेर:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड येथे कॅन्सर तपासणी व्हॅन यांच्या माध्यमातून विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात स्त्री रोग तज्ञ डॉक्टर भूषण पाटील यांनी स्तन व गर्भाशय (ग्रीव्हा) कर्करोगाची तपासणी केली. शल्य चिकित्सक डॉ. सुमित पाटील यांनी मुखाच्या कर्करोगाची तपासणी करून रुग्णांना आवश्यक मार्गदर्शन केले या शिबिरात 142 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.
कर्करोगावर लवकर निदान होऊन वेळीच उपचार मिळावेत या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते हे शिबिर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीश गोसावी, यांच्या मार्गदर्शना खाली पार पाडले. शिबिराचे आयोजन प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड वैद्यकीय अधिकारी डॉ.साहिल चौधरी, डॉ.विद्या देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी प्रा. आ.केंद्र मारवड येथे वैद्यकीय अधिकारी डॉ साहिल चौधरी आणि डॉ. विद्या देवरे तसेच प्रा.आ. केंद्राचे सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते .




