
अमळनेर:- तालुक्यातील गडखांब येथील गांजा प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने तिघांना १३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी ओला व सुका असा एकूण ३ हजार ३३३ किलो ९१ ग्राम असा ३ कोटी ४६ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम याना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी ७ रोजी गडखाम्ब येथील गट नं. २३, २४, २५ मध्ये छापा टाकल्यावर त्यांना एक बिघा शेतात गांजा लावल्याचे आढळले. रात्री उशिरापर्यंत गांजाचे रोपे उपटून पंचनामा केला. त्यात ३ कोटी १४ लाख ११ हजार ७०० रुपयांची ३ हजार १४१ किलो गांजाचे रोपे, १३ लाख १८ हजार ८०० रुपयांचा ६५ किलो ९४० ग्राम सुका गांजा तर १९ लाख २ हजार रुपयांचा १२६ किलो ८०० ग्राम ओला सुका गांजा जप्त केला. या प्रकरणी शेत मालक सुरेश लोटन पाटील (वय ६५) रा. गडखाम्बा, गांजा पेरण्याप्रकरणी सुरेश गंगाराम पावरा वय २९, रा महादेव डोनवाडा ता शिरपूर सचिन रंगण्या पावरा वय २२ रा कालीमुंडी, ता सेंधवा जिल्हा बडवाणी मध्यप्रदेश या तिघांना पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीज यांनी फिर्याद दिल्यावरून अटक करण्यात आली.




