
अमळनेर:- तालुक्यातील पातोंडा मंडळात आंतरराष्ट्रीय महिला वर्ष २०२५-२६ निमित्ताने महिला शेतकऱ्यांचा मेळावा घेऊन जनजागृती करत महिला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली.
तालुक्यातील जळोद, गंगापूरी, पिंपळे, पिळोदा, पिंपळी, देवगाव, देवळी, दहिवद, मुंगसे, अमळगाव, सावखेडा, गडखांब, दापोरी या गावात किडरोग, प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत जनजागृती करण्यासाठी टेलिफोन प्रणाली विकसित केली जात आहे. कृषी महिला बचतगट, कृषी ताई यांचा सहभाग घेऊन महाविस्तार एआय ऍप बद्दल माहिती देण्यात येत आहे. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनींची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी प्रवीण पाटील, योगिता लांडगे, विद्या पाटील, कविता बोरसे, यांच्यासह कृषी अधिकारी अविनाश खैरनार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वाती साळुंखे, ज्योती पाटील यांनीही पुढाकार घेऊन २३ महिलांची नोंदणी केली.




