
अमळनेर – शहरातील शहा आलमनगर परिसरात रस्त्यावर पडलेले तब्बल २५ हजार रुपये प्रामाणिकपणे पोलीस ठाण्यात जमा केल्याची घटना घडली.
शहरातील शहा आलम नगर भागातील रहिवासी अब्दुल हनीफ शेख नथु यांना हे पैसे सापडले. त्यांनी कोणताही विलंब न करता संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन सदर रक्कम पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांच्याकडे जमा केली. पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड यांनी तात्काळ चौकशी सुरू केली. तपासाअंती ही रक्कम इसामोद्दीन शेख यांची असल्याची खात्री झाल्यानंतर अधिकृत प्रक्रिया पूर्ण करून ती रक्कम मूळ मालकाच्या ताब्यात देण्यात आली. या घटनेमुळे प्रामाणिक नागरिकांचे कौतुक होत असून, अब्दुल हनीफ शेख नथु यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.




