
तीन लाखांचा माल जप्त, दोन अटकेत, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई…
अमळनेर : येथील आर के नगर मध्ये बनावट देशी विदेशी दारू निर्मिती करण्याचा कारखाना उध्वस्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १२ रोजी रात्री ९ वाजून १० मिनिटांनी हा छापा टाकण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक जी एस मोरे याना व त्यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार १२ रोजी मांडळ जवखेडा रस्त्यावर एका विहिरीजवळ भावलाल सुखदेव पारवे (वय ३० रा नवलनगर) या अवैधरित्या देशी विदेशी दारू वाहतूक करताना आढळून आला. त्याला अधिक चौकशी केली असता अमळनेर शहरातील आर के नगर मधील दिनेश प्रभाकर खांबायत (वय ४६) हा देशी विदेशी दारू निर्मिती करतो असे समजताच जी के मोरे यांच्या समवेत निरीक्षक अ. कै. सु. मोमीन , विपुल राजपूत ,दिनेश पाटील ,भूषण परदेशी , सुषमा सुल्ताने यांनी रात्री ९ वाजून १० मिनीटांनी आर के नगर मध्ये छापा टाकला असता त्यांना १० हजार ५६० रुपयांच्या ४८ विदेशी बाटल्या १२१०रुपयांच्या ६१० नग देशी दारूच्या बाटल्या , ४ हजार रुपयांचा एक सीलबंद बॉक्स , ४५ हजार रुपयांचे देशी दारू निर्मितीचे भरलेले १०० लिटर ब्लेड चा ड्रम , ४७ हजार २५० रुपयांचा १०५ लिटरचे देशी दारू निर्मितीचे ब्लेड चे कॅन , २५ हजार रुपयांचे सील बंद करण्याचे मशीन , ३० हजार ५५० रुपयांचे विदेशी दारू तयार करण्याचे ब्लेड , ५० हजार रुपयांची मोटरसायकल तसेच दारू वाहतुक करताना आढळून आलेली ८५ हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एम एच १८ , सी जी १५४९ यासह बुच ,खाली बाटल्या असे एकूण ३ लाख १ हजार ७३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींना अटक करून महाराष्ट्र दारू बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जी एस मोरे करीत आहेत.




