
अमळनेर:- तालुक्यातील चांदणी कुऱ्हे येथील नवल उखा धनगर यांनी फिर्याद दिली की ते १० रोजी सकाळी शेतात पिकांना पाणी भरण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीला लावलेला पाईप दिसून आला नाही तसेच १५ हजार रुपये किमतीची ५ अश्वशक्तीची एक मोटर ,१० हजार रुपये किमतीची ३ अश्वशक्तीची एक मोटार , तसेच बाजूच्या शेतातली सुरेश राजराम पाटील यांच्या शेतातील ३ अश्वशक्तीची जलपरी अश्या एकूण ३० हजार रुपये किमतीच्या मोटारी चोरून नेल्या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ३०३(२) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत करीत आहेत.



