
अमळनेर : वाहनांमध्ये गुरांची क्रूरपणे वाहतूक करणाऱ्या शिरपूर तालुक्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील दोन्ही वाहने आणि गुरे मिळून ५ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना ९ रोजी सकाळी १० वाजता घडली.
वाहतूक पोलीस विलास बागुल याना सुभाष चौकात वाहन क्रमांक एम एच १८ ए ए ४२६१ व वाहन क्रमांक जी जे २६ ,टी ७४४६ मध्ये चार बैल दाटीवाटीने विना परवाना गुरांना त्रास होईल अशा पद्धतीने वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी अब्राम जहुर शेख वय २५ आणि सतीश कैलास थोरात वय ३५ दोन्ही रा शिरपूर अशी सांगितली. पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणाऱ्यास प्रतिबंधक कायदा कलम ११(द)(ई)(फ)(क), भारतीय न्याय संहिता कलम ३(५ ) सह मुंबई पोलीस कायदा कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. आणि पोलिसांनी ४८ हजाराची चार बैल ,२ लाख १० हजाराचे वाहन तसेच दुसरे २ लाख ५० हजाराचे वाहन असा एकूण ५ लाख ८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.




