
अमळनेर : बिर्याणी खाऊ घातली नाही म्हणून राग येऊन एकाने तीक्ष्ण हत्याराने डोळ्याच्या भुवयीवर वार केल्याची घटना ८ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फरशी पुलावर घडली.
कार्तिक दिनेश धाप (वय १६ रा कोष्टीवाडा) हा फरशी पुलावर शिवशक्ती दुकानावर सोयाबीन बिर्याणी खायला गेला असताना त्याठिकाणी कृष्णा उर्फ अंडापाव बिऱ्हाडे हा बसलेला होता. त्याने कार्तिक ला संगितले की मला बिर्याणी खाऊ घाल. कार्तिकने पैसे नाहीत मी नंतर खाऊ घालेल असे सांगताच त्याला राग येऊन त्याने लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली आणि त्यांनतर हातातील तीक्ष्ण हत्याराने डाव्या डोळ्याच्या भुवयीवर वार केला. मित्रांनी भांडण आवरले. कार्तिकने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून कृष्णा उर्फ अंडा पाव विरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१),११५(२) , ३५१ (२),३५२ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास हेडकॉन्स्टेबल विनोद सोनवणे करीत आहेत.




