
अमळनेर : निर्दयीपणे गुरांची वाहतूक करणाऱ्या शिरपूर येथील एकाला अटक करून वाहनसह गुरे असा सव्वा दोन लाखाची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
१५ रोजी सकाळी ७ वाजता शिरपूर तालुक्यातील के जी रोड वरील अंबिता नगर मधील सरफराजबेग फरीदबेग मिर्झा वय २१ हा अमळनेर शिरपूर रस्त्यावर मिलचाळ भागाजवळ वाहन क्रमांक एम एच १८ बी जी ९१२० मधून दोन गोऱ्हे कोंबून निर्दयीपणे वाहतूक करताना आढळून आला. गोपनीय शाखेचे सिद्धांत शिसोदे यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला सरफराज विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देण्यास प्रतिबंधक करणारा कायदा कलम ११(ड)(ई)(फ)(क) व भारतीय न्यायासंहिता कलम ३(५) ,मुंबई पोलीस कायदा कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड करीत आहेत. आरोपी सरफराज याला अटक करून त्याच्या ताब्यातील २५ हजार रुपये किमतीची गुरे आणि दोन लाख रुपये किमतीचे वाहन असा सव्वा दोन लाखाची मालमता जप्त करण्यात आली आहे.




