
अमळनेर:- दिनांक 19 फेब्रुवारी शिवजयंती निमित्ताने शहरातील उज्वल फाउंडेशन स्वामी प्री स्कूल यांच्या वतीने चित्रकला, रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी नगरसेवक राजू फाफोरेकर , नगरसेवक अपूर्वा जालिंधर चौधरी, प्रा. उषा पवार (शिक्षण शास्त्र महाविद्यालय) उज्वल फाउंडेशनचे अध्यक्ष सुदर्शना सिसोदे, सचिव दिलीप पाटील, साने गुरुजी फाउंडेशनचे सचिव नरेंद्र पाटील,कलाशिक्षक अशोक पाटील, कलाशिक्षक वैशाली पाटकरी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शना सिसोदे यांनी केले. प्राध्यापिका उषा पवार यांनी विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांविषयी माहिती दिली.त्यानंतर राजू फाफरेकर ( नगरसेवक) यांनी ओम नगर या बोर्डाचे उद्घाटन केले. उज्वल फाउंडेशन वतीने प्रथम द्वितीय तृतीय विद्यार्थ्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र स्पर्धेच्या शेवटी निकाल घोषित करून देण्यात आले. स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




