
अमळनेर – शहरात धुळे रोड लगत मध्यवर्ती भागात १० कोटी रुपये खर्चून पंचायत समितीची म्हणजेच तालुकास्तरीय मिनी मंत्रालयाची आधुनिक प्रशासकीय दुमजली इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.
येत्या तीन महिन्यात इमारतीचे काम पूर्ण होणार असून यात शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा व स्वच्छता, कृषी, महिला व बालविकास यासह इतर सर्व विभागांना स्वतंत्र मोठे हॉल, त्याचबरोबर सभापती, उपसभापती व गटविकास अधिकारी यांना स्वतंत्र दालनाची व्यवस्था असून सुसज्ज व आधुनिक सोयी- सुविधायुक्त मोठा असा मीटिंग हॉल, तसेच अभ्यागतासाठीं स्वतंत्र वेटिंग रूम या प्रशासकीय इमारतीत साकारण्यात येत आहे. येथे स्वतंत्र पार्किंग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा प्रकल्प, तसेच आग प्रतिबंधक उपाययोजना देखील करण्यात येत आहेत.




