
अमळनेर : येथील अष्टविनायक नगर तर्फे शिवजन्मोत्सव अंतर्गत आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत पुरुष गटात पारोळा येथील प्रमोद पुंजू शिरसाठ व महिला गटात नाशिकच्या साक्षी अनंत कसबे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. तर रक्तदान शिबिरात ४३८ दात्यांनी विक्रमी रक्तदान केले.
अष्टविनायक नगर तर्फे अमोल पाटील व पराग चौधरी यांनी १५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात शिवकालीन लाठ्या काठ्या फिरवणे या कलेचे दररोज मुलांना मोफत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशांत गीते यांनी शहरातील शाळांमध्ये प्रशिक्षण दिले. वसंत हंकारे यांचे बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान झाले त्यावेळी अनेक मुलामुलींना आणि पालकांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून हुंदकून रडले. प्रा डॉ पंडित थोरात यांचे व्याख्यान संपन्न झाले. शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांनी पोवाडे सादर केले. तर निकिता भदाणे यांनी “प्रतापगडाचा महारणसंग्राम- अचूक वेध” या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
१९ रोजी राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे संयोजन संजय पाटील ,सुनील वाघ यांनी केले. या स्पर्धेत पुरुष गटात कृष्णा ठाकरे(द्वितीय) , किशोर पवार, धानोरा(तृतीय) , महिला गटात पूजा पाटील बहादरवाडी (द्वितीय), उन्नती पाटील (तृतीय) यांनी बक्षिसे मिळवली. तर रक्तदान शिबिरात ४३८ जणांनी रक्तदान केले. त्यात ३७ महिलानी रक्तदान केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष प्रशांत निकम , एस डी देशमुख हजर होते पंच म्हणून महेश माळी , निलेश विसपुते , कमलेश मोरे , कैलास बाविस्कर , सॅम शिंगाणे , स्वप्नील पाटील , गोकुळ बोरसे , डी ए धनगर , जितेंद्र बाविस्कर , मिलिंद पाटील ,राजेंद्र पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन आभार संजय पाटील यांनी मानले.




