
अमळनेर : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे अवर सचिव संजय महाडेश्वर यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी आदेशान्वये येथील ग्रामीण रुग्णालय सनियंत्रण व सल्लागार समितीची रचना करण्यासंदर्भात सूचित केले होते. त्यानुसार येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वर्ग-1 यांनी सोमवार, दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी समितीची रचना केली.
सदर सनियंत्रण व सल्लागार समितीची करण्यात आलेली रचना पुढीलप्रमाणे. अध्यक्ष : आमदार अनिल भाईदास पाटील, सदस्य : पंचायत समितीचे दोन सदस्य तथा प्रशासक, नगरसेवक डॉ. डिगंबर विठ्ठल महाले, अशासकीय संस्थेच्या (एनजीओ) प्रतिनिधी डॉ. भारतीताई पाटील, सामाजिक कार्यकर्ते (महिला)- सौ. पद्मजा रवींद्र पाटील, (पुरुष)- विक्रांत भास्करराव पाटील तसेच समितीतील पदसिद्ध शासकीय सदस्य : मा. जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, जळगाव, मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर, मा. उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमळनेर, मा. पशुसंवर्धन अधिकारी, अमळनेर, मा. तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, अमळनेर, तसेच सदस्य सचिव : मा. वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर, जि. जळगाव यांचा समावेश आहे.




