
पिंपळे रस्त्यावरील घटना, डोळ्यात मिरचीपूड फेकली…
अमळनेर : स्कुटीवर जाणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून पाच लाख 27 हजार रुपयांची पिशवी अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना २५ रोजी सकाळी पिंपळे रस्त्यावर घडली.
बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीन मध्ये जात असताना तीन जण मोटरसायकलवर तोंडाला मास्क लावून आले आणि त्यांनी आधी यतीन कोठारी यांचा चष्मा काढून फेकला त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्याचवेळी त्यांच्याजवळील पाच लाख 27 हजार रुपये असलेली पिशवी खाली पडली आणि चोरटे ती पिशवी घेऊन फरार झाले. व्यापारीने पोलिसांना कळवल्यावरून पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पीएसआय शरद काकळीज हे करीत आहेत.




