
अमळनेर : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने नाफेड अंतर्गत हरभरा खरेदीसाठी नोंदणी सुरू केली असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीतर्फे सचिव डॉ उन्मेष राठोड यांनी केले आहे.
बाजारात गावठी हरभराला ४ हजार८०० रुपये प्रति क्विंटल ते ५ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. मात्र नाफेड ने प्रति क्विंटल ५ हजार ८७५ रुपये भाव जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड खरेदीत फायदा होणार आहे. नाफेड ने हेक्टरी १४ क्विंटल मर्यादा आहे. ऑनलाइन नोंदणी १ मार्च पासून सुरू होणार असून नोंदणीची अंतिम मुदत ३१ मार्च आहे. शेतकऱ्यांनी कार्यालयीन वेळेत बाजार समितीत येऊन स्वतः नोंदणी करावी यासाठी पीक पेरा लावलेला डिजिटल सातबारा ,आधार कार्ड , बँक पासबुक ,आणि भ्रमणध्वनी क्रमांक देणे आवश्यक आहे. शेतकरी स्वतः घरी मोबाईल वरून ई समृद्धी ऍप वर नोंदणी करू शकतात असे सभापती अशोक पाटील ,संचालक मंडळ व सचिव डॉ राठोड यांनी कळविले आहे.




