
अमळनेर:- तालुका फ्रुटसेल सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने त्यात फळ बागायतदार शेतकरी सभासद मधून 13 संचालक निवडून द्यायचे असतात, त्यासाठी एकूण 47 जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते त्यात आज दिनांक 27 रोजी माघारीच्या दिवशी 34 लोकांनी संस्थेचे हित लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध होण्यासाठी माघार घेऊन फक्त 13 सभासद शेतकऱ्यांचे अर्ज राहिल्याने निवडनुक निर्णय अधिकारी एस पी महाजन यांनी 13 संचालकांची बिनविरोध निवड झाल्याचे दुपारी 4 वाजता जाहीर केले.

त्यात सर्व साधारण गटातून जयेशकुमार काटे ( कोळपिंप्री ता पारोळा ),राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत पाटील (पाडळसरे ), नंदकिशोर नेरकर ( कन्हेरे ता पारोळा ), प्रताप पाटील ( फाफोरे ), प्रफुल्ल पाटील ( कोळपिंप्री ता पारोळा ), पुरुषोत्तम सूर्यवंशी ( कंडारी खुर्द ), युवराज पाटील ( बोहरे ), शामकांत पाटील (गोवर्धन), महिला राखीव गटातून मंगलाबाई चौधरी ( निम ), सुवर्णा अहिरराव ( बोहरे), इतरमागासवर्गीय गटातून सुरेश पाटील ( निंभोरा ), अनुसूचित जमाती गटातून हिलाल सैदाणे ( निम ), विशेष भटक्या जमातीतुन ज्ञानेश्वर धनगर ( बोहरे ) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक कामी संस्थेचे सचिव लहू पाटील व कर्मचारी यांनी सहकार्य केले, सर्व बिनविरोध निवडून आलेल्या संचालकातून लवकरच चेअरमन व व्हाईस चेअरमन निवड ही बिनविरोध करण्यात येईल असा निर्धार संचालक मंडळाने केला आहे




