
अमळनेर:- तालुक्याच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सक्रिय असलेले आणि निर्भीड पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे जितेंद्र ठाकूर (जितू भाऊ) यांची पूज्य सानेगुरुजी माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर पतपेढीत तज्ञ संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे आणि लोकहिताचे मुद्दे ठामपणे मांडणारे जितेंद्र ठाकूर आता पतपेढीच्या व्यवस्थापनातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. या निवडीप्रसंगी पतपेढीचे अध्यक्ष सुशीलकुमार भदाणे, उपाध्यक्ष महेश पाटील, सचिव श्रीमती सविता बोरसे, खजिनदार मंदाकिनी भामरे, संचालक संजीव पाटील, रोहित तेले, राजेंद्र पाटील, सचिन साळुंखे, आशिष शिंदे, श्रीमती प्रतिभा जाधव, प्रमोद पाटीलसह व्यवस्थापक सागर पाटील व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
या बिनविरोध निवडीमुळे पतपेढीच्या कामकाजात नवे बळ मिळेल, असा विश्वास सदस्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या असून सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




