
प्रथमच फोम पार्टीचे विशेष आकर्षण, ३ रोजी शानदार आयोजन
अमळनेर:-येत्या 3 मार्चला धुलीवंदन निमित्त खास अमळनेरांसाठी रंगतदार कार्यक्रमाची तयारी आम्ही केली असून तुम्ही फक्त या आणि सहभागी होऊन मनमुराद आनंद घ्या असे विनम्र आवाहन करत मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हल पर्स कडून सर्वत्र निमंत्रण दिले जात आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही “रंग बरसे” ची यंदाही जय्यत तयारी, मुंदडा बिल्डर्स तर्फे करण्यात आली असून यानिमित्ताने शानदार कार्यक्रमाचे आयोजन मुंदडा इस्टेट, 300 बंगलोज,गलवाडे रोड,अमळनेर येथे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत करण्यात आले आहे.यंदाचे आकर्षण म्हणजे यंदा अमळनेरात प्रथमच फोम पार्टी आयोजित केल्याने रंगा सोबतच फोम चा मनमुराद आनंद घेता येणार आहे.
अजून आकर्षण काय?
याठिकाणी मोफत व्हीआयपी एन्ट्री,कौटुंबिक वातावरण, नॉन स्टॉप म्युझिक,डी जे इलेव्हन आणि व्ही डीजे एरिएस धम्माल असणार आहे.यासोबतच या रंग बरसे कार्यक्रमात रेन डान्स,ढोल धमाका,ऑर्गनिक कलर,फूड स्टॉल आणि लकी ड्रॉ चा मनसोक्त आनंद घेता येणार आहे.
या उत्सवाचे आयोजक असलेले मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलोपर्स, मुंदडा इस्टेट परिवार आणि हेलपिंग हँडस ग्रुपने जय्यत तयारी केली असून शहरातील विविध मंडळे, संस्था, महिला मंडळ,सामाजिक ग्रुप आणि मान्यवरांना सन्मानाने निमंत्रण दिले आहे.तरी सर्वांनी सहपरिवार न चुकता या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उत्सवातून सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न
सदर रंग बरसे उत्सव म्हणजे केवळ आनंदाचा उत्सव नसून या उत्सवातून सामाजिक एकात्मतेचा प्रयत्न मुंदडा बिल्डर्स परिवाराचा असतो,यामाध्यमातून सर्व स्तरातील महिला व पुरुष तसेच युवक व युवती व राजकीय क्षेत्रातील मान्यवर आपसातील मतभेद तथा वैरभाव बाजूला सारून एकत्र येत असतात,प्रेम व आनंदाची देवाणघेवाण याठिकाणी होत असते.विशेष म्हणजे महिलांच्या सुरक्षेची विशेष काळजी म्हणून महिला पुरुषांची स्वतंत्र व्यवस्था याठिकाणी केलेली असते.प्राधान्याने महिला व युवती वगळता सहकुटुंब येणाऱ्यांनाच येथे प्रवेश दिला जात असतो,कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात केलेले असतात. यामुळे आजपर्यंत एकाही वर्षी कोणताही अनुचित प्रकार याठिकाणी घडलेला नाही.म्हणूनच संपूर्ण शहरातून महिला भगिनी व युवतींची मोठी गर्दी येथे होऊन कोणतीही भीती न बाळगता अतिशय जल्लोषात या उत्सवाचा आनंद ते घेत असतात.यामुळेच हा उत्सव म्हणजे अमळनेरकरांसाठी प्रेमाचे प्रतीकच ठरला आहे.




