
अमळनेर:-येथून सोबतच बेपत्ता झालेले दोन्ही बालक ठाणे येथे सुखरूप सापडले असून रेल्वे पोलिसांनी दिनांक 1 रोजी त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द केले आहे.

प्रतीक विकास पाटील वय 14 वर्ष, राहणार सुरभी कॉलनी व हर्ष दत्तप्रसाद बडगुजर वय 14 वर्ष, राहणार युनियन बँके मागे अमळनेर ही दोन्ही मुले दिनांक 28 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 06:30 वाजेपासून घर सोडून बेपत्ता झाले होते,त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता.अखेर ती दोन्ही बालके ठाणे रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांच्या हाती लागल्याने पोलिसांनी चौकशी करून त्यांना ताब्यात घेतले,त्यांच्याकडून ते अमळनेरचे असल्याचे समजल्यावर त्यांच्या पालकांना ठाणे येथे बोलावून ताब्यात देण्यात आले.
दरम्यान ही बालके बेपत्ता होण्याची कारणे समजू शकली नाही मात्र अमळनेर रेल्वे स्थानकावर ते पोहोचल्यावर मेमो गाडीने भुसावळ येथे पोहोचले तेथे बराच वेळ फलाटावर फिरल्यानंतर रात्री मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेत बसून पहाटे ठाण्यात उतरले.तेथे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने ते सुखरूप सापडले आहेत.




