
अमळनेर : गडखांबहुन अमळनेर कडे येणाऱ्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यावरून मोटरसायकलस्वार गंभीर जखमी होऊन उपचार घेताना त्याचा मृत्यू झाल्याची घटना ३ मार्च रोजी घडली.
मुकेश बाळू ठाकरे (रा गडखाम्ब हमु न्यू प्लॉट अमळनेर) हा २७ फेब्रुवारी रोजी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच १९ ई डी ५७९० हिच्यावर आपल्या आईवडिलांना भेटायला गडखाम्ब येथे गेला होता. रात्री परत अमळनेर येताना त्याच्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो खाली पडून रक्तबंबाळ झाला होता. त्याला उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले. ३ मार्च रोजी त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. त्याचे मेव्हणे निलेश शांताराम पाटील (रा पातोंडा) यांनी फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.




